Blender Grease Pencil Experiments

Blender हे खरं तर 3D एनिमेशन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण ह्यामध्ये Grease Pencil नावाचा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. ह्याच्या द्वारे आपण 2D एनिमेशन करू शकतो.

माझं पारंपारिक 2D एनिमेशनचे शिक्षण झाल्यामुळे हे माध्यम मला जास्त जवळचे वाटते आहे. त्यामुळे सध्या मी Grease Pencil खोलात जाणून घेण्याचा प्रयत्न करते आहे. YouTube सारख्या वेबसाईटवर इंग्रजी आणि इतर फिरंगी भाषेतील व्हिडीओ उपलब्ध आहेत. परंतु, ते कळायला कठीण, कारण युरोपियन लोकांचे उच्चार!!! बरीचशी recordings अंधाऱ्या जागेत आणि सदोष आवाजात!!!

दरम्यान, www.dwibhashi.org, ह्या website साठी मला चित्र आणि एनिमेशन करण्याचे काम मिळाले. समीर च्या सांगण्या वरून एनिमेशन साठी Grease Pencil वापरण्याचे ठरवलं! सुरवात खूप उत्साहात झाली. बऱ्याच चुका झाल्या, खूप काम वायाही गेलं! पण आता हळू-हळू हे software समजू लागलं आहे, आणि नवीन एनिमेशन करण्याची खरी मज्जा येते आहे.

नुकतीच केलेली काही एनिमेशन इथे बघता येतील!! तुमचे अभिप्राय कळवा!!

26jan_with-colour-background

Advertisements